काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा शिवसेना विभागप्रमुख भिवंडी व शिवशक्ती मित्रमंडळ कोंडाजी वाडी भिवंडीचे अध्यक्ष विलास मल्लिकार्जुन देवकर यांनी भिवंडीत मराठवाड्यातील आपल्या भागातील कामानिमित्त गेलेल्या नागरिकांना 150 किराणा साहित्याच्या किटचे वाटप विलास देवकरसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सोशल डिस्टिंक्शनचे पालन करीत  घरपोच वाटप केले. 

लॉकडाऊनमुळे भिवंडीतील अनेक व्यवसाय ठप्प झाले आहे. त्यामुळे नाका कामगार, रिक्षाचालक व हातावर पोट असणा-या व कामानिमित्त भिवंडीत गेलेल्या गोरगरीबांसमोर असंख्य अडचणी उभ्या राहिल्या आहेत. भिवंडीतील मराठवाड्यातील ग्रामीण भागातील कामानिमित्त गेलेल्या अनेक गोरगरीब कुटुंबाकडे लॉकडाऊनमुळे किराणा वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसेच नसल्याचे चित्र दिसत असल्याने तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे भिवंडी विभागप्रमुख विलास देवकर   आणि त्यांचे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून संकट काळात मदत करावी या हेतूने आपल्या भागातील नागरिकांना आधार देत 150 कुटुंबाना किराणा साहित्याच्या किटचे वाटप करून त्यांना आधार दिला.

    यावेळी भिवंडी शिवसेनेचे विभागप्रमुख विलास देवकर, रामदास देवकर, अॅड. हणमंतराव जाधव,भागोजी कारके, नागनाथ सुतार, दाऊद पठाण,अनिल फंड आदी मान्यवर उपस्थित होते.


 
Top