नळदुर्ग, दि. २७ :
नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अश्विन कांबळे दि. 26.04.2020 रोजी 22.030 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर खानापूर फाटा येथे कर्तव्य बजावत होते. यावेळी 1)सोमनाथ कांबळे 2) आकाश कांबळे 3)आप्पाराव कांबळे 4)सुर्यकांत घोडके 5)गंगाराम आनंदकर सर्व रा. मोतीलाल नगर, सोलापूर हे सर्व नाका- तोंडास मास्क न बांधता, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन फिरत होते. यावर पोलीस नाईक अश्विन कांबळे यांनी त्यांना हटकले असता वरील व्यक्तींनी त्यांना धक्काबुक्की करुन शिवागाळ केली. अशा प्रकारे त्यांनी लोकसेवकाच्या (पोलीसाच्या) शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा केला. अशा मजकुराच्या पो.ना.- अश्विन कांबळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपींविरुद गुन्हा दि. 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.