उमरगा : उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व सिमा विनापरवाना प्रवासास बंद केल्या आहेत. तरीही पोलीस नाकाबंदी टाळून छुप्या मार्गाने 1)महेबुब नालसाहेब मातोळे रा. जकेकुर, ता. उमरगा हा दि. 15.04.2020 रोजी बाहेर जिल्ह्यातून मौजे जकेकूर येथे आला. तर 2)कल्पना गुरुनाथ बनशेट्टे रा. हागलुर, ता. आळंद, जि. गुलबर्गा, राज्य- कर्नाटक या दि. 16.04.2020 रोजी हागलुर येथून मौजे कोळसूर (गु.), ता. उमरगा येथे आल्या. तर, 3)प्रशांत मल्लिकार्जुन लिंबाळे 4)माय लिंबाळे दोघे रा. एकुरगा, ता. उमरगा हे दोघे दि. 18.04.2020 रोजी पुणे येथून एकुरगा येथे आले. तसेच 5)श्रीनिवास शिरगुरे 6)विद्यावती म्हेत्रे 7)ऋतुजा म्हेत्रे 8)वैष्णवी म्हेत्रे 9)वेदांत म्हेत्रे 10)दिपक कासावाडे 11)रविराज माळी 12)प्रशांत माळी 13)सतिश जाधव सर्व रा. उमरगा 14)दिपक वामणे रा. आलुर, ता. उमरगा हे सर्व दि. 22.04.2020 ते 23.04.2020 या कालावधीत बाहेर जिल्ह्यातुन उमरगा शहरात आले.
              
 अशा रितीने वरील सर्वांनी मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. अशा मजकुराच्या संबंधीत गावच्या पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 अन्वये स्वतंत्र 4 गुन्हे दि. 27.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.
 
Top