उस्मानाबाद, दि. 20 : लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हादंडाधिकारी यांचा आदेश झाला आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत खालील चार प्रकरणांत कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: रस्ता, बाजार, ईमारती इत्यादी ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर एकुण 370 कारवाया करुन 74,000/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी नाक- तोंड न झाकणे (मास्क न वापरणे): 149 कारवाया करुन 74,200/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: किराणा- भाजी दुकाने, जिवनावश्यक वस्तु दुकाने इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 131 कारवाया करुन 37,000/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

4)जिवनावश्यक वस्तु दुकाना समोर दर पत्रक न लावणे: किराणा दुकाना समोर दर पत्रक न लावणाऱ्या दुकान चालकांविरुध्द 30 कारवाया करुन 30,000/- रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

            तर आज रोजी याच प्रकरणांत विविध कारवाया सुरु आहेत.
 
Top