उस्मानाबाद, दि. २८ :

 गुलाब हसन शेख, समिर बशीर मुलानी, विजय बापुराव ठोसर सर्व रा. खासापुरी क्र.2, ता. परंडा यांना जिल्हा परिषद शाळा, खासापूरी क्र.2  येथे प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. असे असतांनाही ते दि. 27.04.2020 रोजी मौजे खासापूरी क्र.2 येथे नाका- तोंडास मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरले. तर, अल्ताफ गुलाब शेख रा. वाटवडा, ता. कळंब यांच्या हातावर क्वारंटाईन शिक्का असतांनाही ते दि. 28.04.2020 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आढळले अशा प्रकारे त्यांनी मा. जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. अशा मजकुराच्या शिक्षक व ग्रामसेवक यांच्या प्रथम खबरेवरुन वरील व्यक्तींविरुध्द गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
 
Top