उस्मानाबाद, दि. २५ : उस्मानाबाद जिल्ह्यात दि.24.04.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल अशा निष्काळजीपणाचे कृत्य करणारे 1)दिपक नवनाथ भांडवलकर 2)श्रीकांत नारायण भांडवलकर दोघे रा. वाटेफळ, ता. परंडा 3)विक्रम गणपत कांबळे 4)भानुदास संपत खटके दोघे रा. नांदुर्गा, ता. उस्मानाबाद, तर शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन उस्मानाबाद येथे भाजी विक्री- किरणादुकान उघडे ठेउन साहित्य विक्री करणारे 5)प्रेमनाथ विश्वनाथ जाधव 6)निर्मला मधुकर शेळके दोघे रा. बॅंक कॉलनी कॉर्नर, उस्मानाबाद, तसेच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन नाका- तोंडास मास्क न लावता मौजे इटकळ येथे पार्टी साजरी करणारे तीघे 7)दिलीप त्रिंबक भोकरे रा. नांदुरी 8)पुंडलीक निवृत्ती गायकवाड 9)विजय जिवनराव माशाळकर दोघे रा. इटकळ, ता. तुळजापूर या सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270, 271, 34 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 4 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे दि. 24.04.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.