ताज्या घडामोडी


पोलीस ठाणे, उमरगा : उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद केल्या असतांना देखील पोलीस नाकाबंदी टाळून छुप्या मार्गाने ईस्माईल रावसाहेब कांबळे रा. त्रिकोळी, ता. उमरगा हा दि. 24.04.2020 रोजी 11.00 वा. सु. बाहेर जिल्ह्यातून मौजे त्रिकोळी येथे आला आहे. अशा रितीने त्याने इतरांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे, तसेच मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. अशा मजकुराच्या पोलीस पाटील- विकास पाटील यांच्या फिर्यादीवरुन त्याच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 अन्वये गुन्हा दि. 24.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: नजीन हुसेन अत्तार रा. काशेगाव, ता. सोलापूर हा सोलापूर येथून उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस नाकाबंदी टाळून छुप्या मार्गाने दि. 24.04.2020 रोजी 19.00 वा. सु. मौजे येवती येथे आला. स्वत:ची कोरोना बाबतची आरोग्य तपासणी न करता सार्वजनिक ठिकाणी नाका- तोंडास मास्क न लावता स्वत:ची व इतरांची सुरक्षीतता धोक्यात येईल अशी निष्काळजीपणाची कृती करत असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळुन आला. अशा मजकुराच्या सपोनि- श्री. मनोहर वानखेडे यांच्या प्रथम खबरेवरुन वरील व्यक्तीविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, साथीचे रो गप्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 सह, म.पो.का. कलम- 135 अन्वये गुन्हा दि. 24.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
 
Top