उस्मानाबाद, दि. २५ : शासकीय तंत्रनिकेतन मुलांचे वस्तीगृह, उस्मानाबाद येथील वस्तीगृहाच्या ईमारतीची जिन्या जवळील भिंत फोडून- वस्तु भांडारचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 16.03.2020 ते 23.04.2020 या कालावधीत तोडून आतमधील साहित्य (पातेले, परात, हंडे, मिक्सर, कुकर) व छतावरील सोलर वॉटर हिटींग सिस्टीमचे साहित्य (एकुण किं.अं. 4,52,336/-रु.) चोरुन नेल्यावरुन पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- किसन जगताप, प्रमोद थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, गव्हाणे, पोकॉ- मरलापल्ले, महिला पोकॉ- वैशाली सोनवणे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी- किरण राम लोंढे उर्फ कृष्णा रा. जुना बस डेपो पारधी पिढी, उस्मानाबाद यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी सोलर च्या तांब्या धातुच्या 5 प्लेटा (एकुण किं.अं. 1,25,000/- रु.) जप्त करुन आरोपीस पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे हजर केले असुन गुन्ह्यातील उर्वरीत आरोपींचा शोध घेण्यास चालू आहे. (सोबत छायाचित्र जोडले आहे.)