वागदरी : एस.के.गायकवाड

चिवरी ता.तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रसिंग कचवा हे स्वखर्चाने आपल्या टँम्पोवर स्पिकर लावून करत आहेत कोरोना विषयी जाणीव जाग्रती.
  
 कोरोना विषाणूच्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी शासना बरोबरच समाजातल्या सर्व स्तरातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. देशपातळीवर लाँकडाऊन व संचार बंदी लागु करुन कोरोनाला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न चालू आहे. आशा महामारीच्या काळात चिवरी ता.तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रसिंग कचवा यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वतः च्या खर्चाने आपल्या टँम्पोवर स्पिकर लावून गावोगावी जावून कोरोना विषयी जाणिव जाग्रती करीत आहेत. घाबरून नका,काळजी घ्या, हात साबनाने स्वच्छ धुवून घ्या ,विणाकारण घराबाहेर पडू नका अशा संदेश देत गाडी घेऊन खेडोपाडी, वस्ती वाडीत फिरत आहेत. आपल्याला कसलीही अपेक्षा नाही, शासनाच्या मदतीची गरज नाही. एक सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आपण हे प्रबोधनाचे काम करत असून लवकरात लवकर भारत कोरोना मुक्त व्हावा ही आपली इच्छा आहे.असे त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारले असता सांगितले.
 
Top