वागदरी, दि. २६ : वागदरी ता. तुळजापूर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वच कुटुंबाला हात धुण्यासाठी सानिटायझर बाटल्याचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. सध्या स्थितीत उस्मानाबाद जिल्हा हा ग्रिन झोन कडे वाटचाल करीत असला तरी जवळच असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारी घेणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून वागदरी येथील ग्रा.प.च्या वतीने वारंवार हात साबनाने किंवा सानिटायझर ने धुवा ,स्वतःची काळजी घ्या काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या असाप्रकारे प्रबोधन करत येथील २१८ कुटुंब प्रमुखाना एकुन ४११ सानिटायझरच्या बाटल्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कोरोना सहय्यता कक्ष प्रमुख तथा ग्रामसेवक जी.आर.जमादार, सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच दत्ता सुरवसे, ग्रा.प.सदस्य रावसाहेब वाघमारे, महादेव बिराजदार, विद्या बिराजदार,आशा कार्यकर्ती भारताबाई बिराजदार, अंगणवाडी कार्यकर्ती पद्दमीनबाई पवार, मदतनीस रुपाली जाधव,पत्रकार एस.के.गायकवाड आदीनी घरोघरी जावून बाटलीचे वाटप केले.