होर्टी : बाळकृष्ण मुळे
तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे दिनांक 26 रोजी ग्रामपंचायत कार्यालय होर्टी येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी महात्मा बसेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायतच्या सरपंच सौ सुवर्णा गुंजिटे यांनी केले.
यावेळी उपसरपंच अशोक राजमाने ग्रामपंचायत सदस्य संजय गुंजिटे.. ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर भोसले, माणिक गजीले, शिव ग्रुप होर्टीचे मारुती राजमाने,किरण मुळे,राज वरदे, शिवम साखरे,शिवशंकर राजमाने, रोहन वरदे, नीलकंठ राजमाने, उमेश राजमाने,नवनाथ सराटे, बाळू मुळे,श्रीशैल्य कुंभार, आदीजन उपस्थित होते...