काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथील अनेक नागरिक बऱ्याच दिवसांपासून कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास आहेत. लॉकडाऊन मुळे पुण्यातील अनेक व्यवसाय व कंपन्या बंद आहेत. त्यामुळे दहिवडीतील या नागरिकांसमोर कामच बंद असल्याने असंख्य अडचणी उभ्या असून या गोरगरीब कुटूंबाकडे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही पैसे नसल्याने दहिवडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पुण्यात वास्तव्यास असलेले विठ्ठल आप्पा गायकवाड यांनी तुळजापूर तालुक्यातील मंगरुळचे उद्योजक सन अँड ओशनचे संचालक राजकुमार (बापू) धुरगुडे यांचेकडे दहिवडीच्या पुण्यात कोरोना विषाणूच्या संकटात अडकलेल्या या लोकांसाठी मदतीसाठी पाठपुरावा केला होता. मुळातच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या व समाजसेवेची आवड असणाऱ्या धुरूगुडे कुटुंबातील जिल्हा परिषद सदस्य महेंद्र (काका) धुरुगुडे यांचे थोरले बंधू समाजसेवक
राजकुमार (बापू) धुरूगुडे यांनी क्षणाचाही विचार न करता सामाजिक बांधिलकीचे व्रत जोपासत आपल्या परीने सेवा करण्यासाठी हात पुढे करीत पुण्यात कोरोनाच्या संकटात अडकलेल्या आपल्याच तालुक्यातील दहिवडीतील बांधवांसाठी मदतीसाठी हात पुढे करीत बालाजी नगर मार्केट यार्ड पुणे येथे राजकुमार धुरूगुडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सात कुटूंबांना किराणा साहित्य व मास्कचे वाटप करण्यात येऊन उर्वरित दहिवडीतील 50 कुटूंबाना किराणा साहित्याचे किट व मास्कचे विठ्ठल गायकवाड व सहकाऱ्या मार्फत घरपोच साहित्य वाटप करण्यात आले.
या वेळी विठठल आप्पा गायकवाड(दहिवडीकर),सन्नी चव्हाण, तानाजी कोरेकर, आदी मान्यवर होते.