नळदुर्ग, दि. २५ :
लॉकडॉनच्या काळात शांतता व सुव्यवस्थेसाठी आपल्या जीवाची बाजी लावून समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सरकारी यंत्रणा व विविध संस्था, संघटना ,समाजसेवा करणाऱ्या व्यक्ती आता पोलीस प्रशासन ,आरोग्य विभाग, सफाई कामगार व अन्य संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून पुढे येताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलिसांच्या प्रति असलेली कृतज्ञता म्हणून नळदुर्ग पोलिस स्टेशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना चिकुंद्रा ता. तुळजापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान समुह साधन समन्वयक केशर जाधवर, महिला बचत गटाच्या अनुसया जोगी , सत्यवान गायकवाड, नजीर शेख ,गणेश गायकवाड यांच्यावतीने फ्रुट व मिनरल वॉटर किटचे वाटप करण्यात आले.
नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे , शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे , सचिन गायकवाड यांच्या हस्ते सदर साहित्याचे वाटप करण्यात आले.