तुळजापूर, दि.  23 :

महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक साहित्यिक राजकीय व सामाजिक जीवनातील समाज परिवर्तनवादी युगपुरुष एक महान तत्वज्ञानी समाजप्रबोधक प्रसिद्ध कवी आणि लिंगायत धर्म संस्थापक होते. महात्मा बसवेश्वरांनी जातीपातीच्या भिंती गाडुन तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती.

त्यांनी शोषणविरोधी भेदभाव विरोधी जातीभेद विरोधी श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसती लढली नाही तर ती यशस्वी करून दाखवली. समता नायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती जगभरात धुमधडाक्यात साजरी होते. यंदा कोरोणामुळे देशात लॉकडाऊन असल्याने जयंतीच्या कार्यक्रमावर मर्यादा येणार आहेत. फेसबुक वर लाईव्ह व्याख्यानाचे आयोजन लिंगायत सेवा संघ उस्मानाबाद यांनी केले आहे 26 एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता प्रमुख वक्ते इतिहास अभ्यासक युवा व्याख्याते सुनील समाने सर हे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा जागर करणार आहेत. या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईन सभा घेऊन विचारांचा जयंतीत सहभागी व्हावे. असे आव्हान लिंगायत सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे संयोजक

संतोष येवले,सिद्धेश मुडके, देवराज संगुळगे,स्वप्नील पांचाळ, गुंडाप्पा चौगुले, हनुमंत शंखे, बाळु मुळे ,बाबा खरटमल, शरणाप्पा काशेट्टी, विवेक चौधरी आदिजन.
 
Top