वागदरी : एस.के.गायकवाड
सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला असून त्याच्या प्रतिबंधासाठी लाँकडाऊन व संचार बंदी पुकारल्याने मौजे खुदावाडी पाटील तांडा येथील ऊसतोड कामगार कुंडल ता. पलूस जि सांगली येथील साखर कारखान्यात ऊसतोडणी साठी गेले होते ते दि 20/04/2020 रोजी पाटील तांडा येथे आले आहेत.त्यांना होम क्वारंटाईन साठी पाटील तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था केली आहे.
या काळात कोणीही ऊसतोड कामगार उपाशी राहू नये म्हणून ग्रा .प. कडून सरपंच शरद नरवडे उपसरपंच पांडुरंग बोंगरगे , सर्व ग्रा. प.सदस्य , सोसायटी चेअरमन तुकाराम बोंगरगकिलो सामाजुक कार्यकर्ते डॉ.सिद्रामप्पा खजुरे आदींच्या वतीने तांदूळ, किराणा मालाचे किट व जीवनावश्यक वस्तू पाटील तांडा येथील २९ गरजू ऊसतोड कामगारांना सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य समजून
ग्रा. प. सदस्य सावंत पवार व ग्रा. प. सदस्या ताराबाई पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले