तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील गोंधळवाडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने १४ वा वित्त आयोगाच्या निधीमधुन गावातील नागरीकाना मोफत मास्क व सॅनिटाइजर बाटलीचे वाटप करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्हा जरी कोरोनामुक्त झाला असला तरी शेजारील सोलापुर शहरामध्ये कोराना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरीकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावामध्ये चार वेळा किटकनाशक औषधाची फवारणी करून घेतली आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत गावामध्ये कोरोना कक्षाची स्थापना करण्यात आली असुन परजिल्ह्यातुन आलेल्या नागरकांची नोंद करून आरोग्य तपासणी केली जात आहे.आतापर्यंत ९३ लोकांचा होमक्वारंटाईनचा १४ दिवसाचा अवधी पुर्ण झाला असुन आणखी तीघाजणाना विलग ठेवण्यात आले असल्याचे कोरोना कक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी १४ वा वित्त आयोगाच्या निधीमधुन ग्रामपंचायतीच्या वतीने गावामधील सर्व नागरीकाना मास्क व सॅनिटाइजरचे वाटप करण्यात आले आहे.
या कोरोनाच्या लढाईसाठी ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ,आरोग्य अधिकारी,पोलिस हीरीरीने काम करत असुन प्रशासनाच्या सुचनाचे सर्व ग्रामस्थ् पालन करीत आहेत.तसेच ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांना ग्रामस्तरावर प्रोत्साहन भत्त्याचे वाटपही करण्यात येत असल्याचे सरपंच लक्ष्मी मोटे यानी सांगितले. कोरोनाला घाबरू नका परंतु दक्षता घ्या प्रशासनाच्या नियमांचे पालन करा कोरोना हारेगा भारत जितेगा असा विश्वासही सरपंच, ग्रामसेवक व पोलिस प्रशासन यानी जनतेला दिला आहे.