नळदुर्ग : सुहास येडगे
कोरोना विषाणूने संपूर्ण जगातच धुमाकूळ घातला आहे, दरम्यान लाखो नागरीकांना याची बाधा झाली आहे, तर हजारो नागरीक या रोगाने दगावले आहेत. दरम्यान अशा या महाभयंकर रोगाने संपूर्ण जग हतबल झालेले आसताना या रोगाशी लढा देणारे, आपले नागरीकांप्रती कर्तव्य बजावणारे पोलिस यंत्रणा, त्याच बरोबर प्रशासनातील सर्वच कर्मचारी हे आपल्या परिने कर्तव्य बजावत आहेत, परंतु नागरीकांसाठी अनेक संस्था, दानशुर व्यक्ती मदतीचा हात पुढे करीत दान करीत आहेत मात्र या सर्वामध्ये पोलिसांनाही कांही तरी आपल्या परिने मदत करावी म्हणून बरेच दानशुर व्यक्ती किंवा संस्था ही आज पुढे येत आहेत, याचाच एक भाग म्हणून नळदुर्ग येथील हॉटेल नळदुर्ग महाराजा पॅलेसचे मालक सतीश पवार, स्वप्नील पवार यांनी ही आपला मदतीचा हात पुढे करीत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे यांना पंचेवीस पाणी बाटलीचे बॉक्स पोलिसांसाठी मदत म्हणून दिले आहे.
सध्या मोठया प्रमाणात कडक उन्हाळा जाणवत आहे, कडक उन्हाचे चटके सहन करीत नागरीकांना घरी थांबविण्यासाठी आहो रात्र झटणारे पोलिस पाहल्या नंतर मनाला वेदना होतात. अशा परिस्थीतीत कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलिसांची माणुसकी ही या माध्यमातून दिसून आली आहे पंरतु त्यांच्यासाठी नागरीकांनी ही आपली माणुसकी दाखविणे गरजेचे आहे म्हणून उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना उन्हामध्ये त्यांच्याकडे पाण्याची बाटली असावी या हेतून नळदुर्गचे हॉटेल नळदुर्ग महाराजा पॅलेस चे मालक सतीश पवार, स्वप्नील पवार, आंबादास पवार यांच्या वतीने नळदुर्गच्या पोलिस ठाण्यातील पोलिसांसाठी पंचेवीस पाणी बाटलीचे बॉक्स भेट देण्यात आले आहेत. हे बॉक्स नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे यांच्याकडे स्वप्नील पवार, आंबादास पवार यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी माजी सैनिक सचीन आवचार व पत्रकार तानाजी जाधव उपस्थीत होते. यावेळी सपोनि मनोहर वानखेडे यांनी हॉटेल नळदुर्ग महाराजा पॅलेसचे धन्यवाद मानले.