मुरुम, दि. २५ :
सामाजिक बांधीलकीच्या भूमिकेतून श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,मुरूम यांच्या कडून एक लाख एक हजार रुपयाचा धनादेश कोविड-१९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी शुक्रवारी (ता.२४) रोजी उमरगा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी व्ही.एस.स्वामी यांच्याकडे पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन शिवशरण वरनाळे, व्हाईस चेअरमन शरणप्पा मुदकण्णा,संचालक श्रीशैल बिराजदार,नागेश पाटील,अशोक जाधव,अमृत वरनाळे यांनी सुपुर्द केला.
कोरोना पाश्वभूमीवर सरकारला मदत करण्यासाठी पतसंस्थेची तातडीची बैठक चेअरमन शिवशरण वरनाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेवून आर्थिक सहाय्य करण्याचा ठराव सर्वानुमते पास करून घेतला.या अगोदरही संस्थेकडून १२५ जीवनावश्यक कीटचे वाटप गरजूंना केले आहे.कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस राज्यात वाढत असून या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून केंद्र व राज्यसरकार शर्तीचे प्रयत्न करत आहेत.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सातत्याने व्हावा.याकरिता राज्यातील सर्व सहकारी पतसंस्था कोरोनातून मुक्तता होण्यासाठी आर्थिक साहाय्य करत आहेत.