काटी : उमाजी गायकवाड

देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. (14) रोजी काटी येथे भैरवनाथ जोगेश्वरी कालाष्टमी घरगुती स्वरूपात साजरी करण्यात येणार असून दरवर्षी भैरवनाथ कालाष्टमी निमित्त महाप्रसादाचे वाटप केले जाते . परंतु यंदा कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून प्रशांत प्रभाकर काटीकर आणि राघवेंद्र प्रभाकर काटीकर यांच्या वतीने गोरगरीब कुटुंबातील 45 जणांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
     
     यावेळी प.स. सदस्य रामहरी थोरबोले, सरपंच आदेश कोळी, सुहास उर्फ पिंटू कुलकर्णी, विलास कुलकर्णी, बाळु (काका) कुलकर्णी,सुहास साळुंके, शिवलिंग घाणे,पोलीस पाटील जामुवंत म्हेत्रे उपस्थित होते.
 
Top