अक्कलकोट : धोंडपा नंदे

  महाराष्ट्रासह देशाभरात लॉकडाउन असल्याने राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून सर्वजण आपापल्या परीने मुख्यमंत्री सहायता निधी देत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाव येथे राहणारे महिबुब तांबोळी कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असल्याने,कष्ट केल्याशिवाय पोट भरत नाही,तरीही त्यांनी 5000 रु रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी चेकद्वारे बँकेत सुपूर्द करून एक तरुणापुढे व समाज्यापुढे नवा आदर्श निर्माण केला.
महिबुब तांबोळी

यापूर्वीचे रमजान ईद धुमधडाक्‍यात साजरे केले. मात्र, यंदाच्या रमजान ईदचे पैसे ती रक्‍कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे असे त्यांनी सांगितले. महिबुब यांनी अंत्यंत काष्ठातुन आल्याने त्यांना परिस्थितीची जाण आहे, या पृथ्वी तलावर जन्म घेतल्यावर आपण या समाजाला काही तरी देणं लागत म्हणून त्यांनी आणाआवश्यक खर्चला फाटा दिला.
चप्पळगाव ग्रामस्थ कडून व आसपासच्या गावातील लोकांनी त्यांचे कौतुक केले.. 
 
Top