काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील स्वस्त धान्य दुकानदार  एस. एल. हंगरकर,अमरसिंह निंबाळकर, एम.ए. इनामदार,  आणि एस.बी. महापूरे यांच्या  दुकान क्रमांक अनुक्रमे 1,2,3,व 4 या स्वस्त धान्य दुकानामध्ये सोमवार दि. (20) रोजी तलाठी प्रशांत गुळवे, सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य  वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

 महाराष्ट्रातील जनतेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाॅकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरीब नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोफत धान्य वाटप ही योजना केंद्र सरकारने लागू केली असून या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील गरजूंना दिलासादायक ठरत आहे. या योजनेअंतर्गत गरिबांसाठी एप्रिल ते जून असे 3 महिने प्रती लाभार्थी दर महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची ही योजना आहे. पात्र रेशन कार्डधारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त मोफत तांदूळ 3 एप्रिलपासून टप्याटप्याने  देण्यात येत आहे. 



वितरण सुरळीत सुरू

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन  काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये, म्हणून अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून त्याअनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील काटी येथील स्वस्तधान्य  दुकानदार, एस.एल. हंगरकर, अमरसिंह निंबाळकर, एम.ए. इनामदार, एस.बी. महापुरे यांच्या चारही स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे  वितरण तलाठी प्रशांत गुळवे, सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते लाभार्थी शिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ देऊन मोफत धान्य वाटप योजनेचा  सुरळीत शुभारंभ करण्यात आला.लॉकडाऊनमुळे गोरगरीब नागरिकांचे सर्व उद्योगधंदे, रोजगार धंदे बंद झाले असून या बंद पडलेल्या रोजगारामुळे लॉकडाऊन कालावधीत कोणत्याही गोरगरीब नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटप  योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि अंत्योदय शिधापत्रिका धारकांना एप्रिल,मे, आणि जून या तीन महीन्यासाठी शिधापत्रिकेवरील प्रत्त्येक व्यक्तीला  पाच किलो धान्य मोफत देण्यात येत आहे. मोफत धान्य वाटप करताना या चारही स्वस्त धान्य दुकानदारांकडून सोशल डिस्टंसिंग या शासकिय नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आपल्या दुकानातील  अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका कार्डधारक लाभार्थीना मोफत धान्य वाटप सुरू करण्यात आले. 

    या मोफत धान्य वाटप शुभारंभ प्रसंगी तलाठी प्रशांत गुळवे, सरपंच आदेश कोळी, प.स.सदस्य रामहरी थोरबोले, उपसरपंच सुजित हंगरगेकर, सयाजीराव देशमुख, विक्रमसिंह देशमुख, अमरसिंह निंबाळकर, करिम बेग,पत्रकार उमाजी गायकवाड, पोलीस पाटील जामुवंत म्हेत्रे, सुर्यभान हंगरकर,मुईज इनामदार,  ग्रा.पं. सदस्य शिवलिंग घाणे, भैरी काळे, सुहास साळुंके,युवराज निंबाळकर,आबा शितोळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top