नळदुर्ग : येथिल आपलं घर प्रकल्पातील अनाथ व निराधार मुला मुलीना औरंगाबाद हायकोर्टचे वकिल तथा येणेगुर ता. उमरगा येथिल मुळ रहिवाशी ॲड दयानंद माळी यांच्यावतीने धान्य व इतर साहित्य मदत म्हणुन देण्यात आले.
सध्या लाॕकडाउनच्या कालावधीत अनाथ व निराधार विद्यार्थ्यांची उपासमार होवु नये ,याकरिता ज्वारी ,गहु, गुळसह जिवनावश्यक साहित्य देण्यात आले. यावेळी जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा, ॲड सयाजी शिंदे , पञकार राजेंद्र हूंजे , देवीसिंग राजपूत, औरंगाबाद हायकोर्टचे वकिल ॲड दयानंद माळी आदी उपस्थित होते.
तसेच येणेगुर येथुन आजपर्यंत १८ क्विंटल धान्यासह इतर साहित्य दिल्याचे माळी यानी बोलताना सांगुन निजगुन स्वामी यानी गावातुन धान्यगोळा करुन पन्नालाल भाऊ सुराणा याना सुपुर्द केल्याचे सांगितले.