अक्कलकोट, दि. 20 :

अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथील श्री रामलिंगेश्वर ट्रेडींग कंपनी अक्कलकोट तथा सुहाना फुड प्राॅडक्टस चे मालक श्री वहिदपाशा ईब्राहीम शेख यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून गावातील 25 सर्वसामान्य आणि मोलमजुरी करणार्या कुटुंबाना गृहपयोगी अन्नधान्य किटचे वाटप केले.सध्या महाराष्ट्रात, संपूर्ण देशात आणि जगात कोरोनाने थैमान घातले असता लाॅकडाऊन मुळे गावातील सर्वसामान्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन या  किटचे वाटप केल्याचे शेख परीवार यांच्याकडून सांगण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित सर्वांनी तोंडाला मास्क लावून आणि सामाजिक अंतर राखून सर्व वस्तूचे वाटप केले. या किट मध्ये प्रत्येकी 5 किलो तांदूळ,1 किलो साखर,1 किलो तेल,125 ग्रॅम चहा पावडर,,1किलो मीठ,500 ग्रॅम निरमा पावडर,1 भांडे साबण प्रत्येकी 25 कुटुंबाना देण्यात आले.अशा या कठीण प्रसंगी सर्वोतोपरी मदत केल्याने सर्व गळोरगी ग्रामस्थांनी शेख परीवाराचे विशेष कौतुक केले.

यावेळी वहिदपाशा शेख, ईब्राहीम शेख, सरपंच चंद्रशेखर अंदोडगी, पोलिस पाटील सुरेश मैंदर्गी, कल्लप्पा निरोणे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश हत्तरकी, वे.शरणय्या स्वामी, शिवपूत्र पाटील, ग्रामपंचायत सेवक श्रीशैल पुजारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
Top