मुरुम : ऐन लग्न सराईत कोरोना प्रादुर्भावामुळे वधू-वरांच्या लन्न समारंभाला ब्रेक लागला.त्यांच्या उत्साहाला लगाम बसला आहे. यंदा वधू-वरांच्या नातेवाईकांना मोठया थाटामाटात, धुमधडाक्यात,अ करत मिरवणूकीसह लग्न सोहळा उत्साहात पार पाडावयाचा होता. त्यांची तयारीही जोरात सुरु होती पण या प्रसंगामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे.
मार्च-एप्रिल महिन्यातील तारीखा १९,२६,३०,३१ तर एप्रिल मध्ये २,३,७,९,१५,१६,१८ या शुभमुहूर्ताच्या तारखा होत्या.या कालावधीमध्ये वातावरण ही पोषक असल्याने या महिन्यात अधिक लग्नसोहळे पार पडतात.परंतु देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या रोगाचा प्रसार होऊन नये म्हणून संपूर्ण देश ता.१४ एप्रिल पर्यंत पंतप्रधानानी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. संपूर्ण राज्य व जिल्हाबंदी केल्यामुळे लग्न समारंभाकरिता पत्रिका काढणे,कपडे खरेदी,इतर साहित्य खरेदी करणे आणि मंगल कार्यालय बुकींग करणे,मुलींच्या रुकवताची खरेदी करणे अवघड झाले आहे.
काही समाज बांधवांनी तर साखरपुड्याच्या कार्यक्रमातच लग्नाच्या तारखा निश्चित केला होत्या.त्या दृष्टीने काहीनी तर पत्रिका देखील छापल्या होत्या तर काहींच्या छापणे चालू होते.काहीच्या लग्नतारखा जवळ येवून पत्रिका वाटप पण करण्यात आले असताना या कोरोनामुळे अचानक लॉकडाऊनची घोषणा झाली आणि संपूर्ण यंत्रणाच बंद करण्यात आली.अशा कार्यक्रमामधून मंडप,लाईट,केटर्सवाले,स्वयपाकी,वाजत्रीवाले,फुलवाले,डेकोरेशनवाले,पाणीवाले,भाडोत्री वाहनवाले,पुजारी,ब्राम्हण या व यावर अवलंबून असणा-या सर्व घटकांना यंदाच्या हंगामातील आर्थिक ऊत्पन्न मिळविण्याची संधी गेली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील ज्याचा उदरनिर्वाह यावर आधारीत असतो तेही अडचणीत आले आहेत.या बंदमुळे सर्व व्यवहार थांबले.परंतु ज्यानी या सोहळ्याची जय्यत तयारी केली होती.त्यांची मोठी नाराजी होताना दिसून येत आहे.व ज्याच्या तारखा या महिन्यात आहेत त्यांनाही मोठ्या अडचणीला समोरे जावे लागत आहे कितीतरी कुटूंबे धर्म संकटात सापडली आहे.काय करावे हे समजनासे झाले आहे.काही वधू-वर जे नौकरीच्या निमित्ताने पुणे-मुंबई व मोठया शहरामध्ये आहेत त्यांनी तर शुट्टी काढून व रजा देवून गावाकडे आले होते त्यांनाही नेमके काय करावे हे कळेनासे झाले आहे.
