काटी : उमाजी गायकवाड
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तामलवाडी येथील गरजु नागरीकांना शिवरत्न प्रतिष्ठान व सुयश लॅब यांच्या वतीने शनिवार दि.(11) रोजी कापडी मास्कचे वाटप करण्यात आले.
जगभरात कोरोनाच्या विषाणू ने थैमान घातले असुन या विषाणुने भारत देशामध्येही कहर केला आहे. दिवसेंदिवस देशासह राज्यामध्ये कोराना रूग्णांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत असून केंद्र,राज्य सरकार डाॅक्टर,पोलिस रात्रंदिवस जनतेला वाचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. प्रशासनाला मदत म्हणून आपलाही खारीचा वाटा उचलत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शिवरत्न क्रिडा व सामाजिक बहुउद्देशीय प्रतिष्ठान तामलवाडी व सुयश पॅथाॅलाॅजी यांच्या वतीने दि. 11 रोजी तामलवाडी येथील गरजु नागरीकांना कापडी मास्कचे वाटप करण्यात करण्यात आले.बचत गटाच्या सीआरपी उज्वला जगताप यांनीही मदत करत हे कापडी मास्क मोफत शिवुन देऊन या कार्यास छोटीशी मदत केली आहे.कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व कोणीही घराबाहेर पडु नये असा सल्ला डाॅक्टर अमर मगर व शिवरत्नचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यानी मास्कचे वाटप करताना जनतेला दिला आहे.
याप्रसंगी सुयश लॅबचे संतोष शिंदे, डाॅ.अमर मगर,शिवरत्नचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड,रामदास गायकवाड, सीआरपी उज्वला जगताप,दत्तात्रय जगताप,तानाजी पाटील आदी उपस्थित होते.
