मुरूम, दि. २० : कोरोणाच्या संकटात असलेल्या गरजूं कुटूंबियांना अत्यावश्यक वस्तू गुजरात येथे नौकरीला असणारे पण मुळचे मुरूमचे रहिवाशी संजय रखमाजी शिंदे यांच्याकडून ७५ जीवनावश्यक वस्तूंचे कीट त्यांचे बंधू राजेश शिंदे यांच्या हस्ते गरजूंपर्यंत  जावून देण्यात आले.

माणूसच माणसाच्या मदतीला धावून येतो.याचा प्रत्येय या निमीत्ताने पुन्हा एकदा झाल्याचे इथल्या गरजू नागरिकांमधून बोलतांना दिसून येत आहे.संजय शिंदे यांनी आपल्या समाजाप्रती काही तरी केले पाहिजे.हीच ती वेळ आहे,ही माणूसकीची भावना जोपासून त्यांनी जो खारीचा वाटा उचलला आहे हे खूप महत्वाचे आहे.

सध्या हातावर पोट असणाऱ्या मजूरांचे खुप हाल होत आहेत.त्यात लॉकडाऊन अणखीन ३ मे पर्यंत असल्याने गरजूंनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला असताना या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होणे मजूरांसाठी आवश्यक असल्याने वीरशैव कैक्कय्या समाजाचे अध्यक्ष वसंत शिंदे, तात्याराव शिंदे,सचिन शिंदे,ज्योती शिंदे,दत्ता शिंदे,राजू शिंदे,गिरीश शिंदे,वैभव कटके सह व्ही.के.प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन ढोर गल्लीतील गरजू व्यक्तींना या कीटचे सोशल डिस्टन्सिंग राखून मास्क वापरून  वाटप केले.संजय शिंदे यांच्या या समाज उपयोगी योगदानाबद्ल गरजू व्यक्तीनी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
 
Top