मुरुम : उमरगा व लोहारा तालुक्यात प्रत्येकी एक-एक कोरोना विषाणू बाधित दोन रुग्ण एकाच दिवशी आढळल्याने शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नका,असे वारंवार सांगूनही काही बेजबाबदार तरुण  घराबाहेर पडत आहेत व रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.या लोकांवर पोलीसांनी कारवाई करुन अशा लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.


आता या कारवाई सोबतच शहरातील काही युवकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवार रोजी कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता पुढाकार घेऊन शहरातील नेहरु नगर,भीमनगर,इंगोले गल्ली,सोनार गल्ली,साठे नगर, महादेव नगर,शास्त्रीनगर,ढोर गल्ली,संभाजी नगर,यशवंत नगर आदि भागातील अंतर्गत रस्ते काटेरी झुडपे,झाडाच्या मोठया फांदया,बाबू,इतर मोठी वाहने उभी करुन व इतर साहित्य लावून रस्ते बंद करुन आडविण्यात आली आहेत.यामुळे आतातरी मोटार सायकल,लहान लेकरे सायकल घेऊन  घराबाहेर पडणे बंद होईल या युवकांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेतला.कोरोनाचा फैलाव व संसर्ग रोखता यावा म्हणून गर्दी टाळण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. घराबाहेरच पडू नका, असे वारंवार सांगितले जात आहे.तीन दिवसा पूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्हयात एक दिवसाचा जनता कर्फ्यू लावला होता पण सरकार व प्रशासनाच्या या आवाहनाला न जुमानता काही उत्साही मंडळी यानात्या कारणाने घराबाहेर येणाऱ्यांची संख्या वारंवार वाढताना दिसून येत आहे.त्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.     
      
 
Top