तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात दि.१ में शुक्रवार रोजी दुर्गाष्टमी दिनाचे औच्युत साधुन श्री तुळजा भवानी मातेवर अपार श्रद्धा असलेल्या एका श्री देवी भक्ताकंडुन १०१ हाफुस केसर आंबा मातेच्या चरणी अर्पन केला.
प्रारंभी पहाटे श्री देवीजीचे चरण तिर्थ होऊन त्यानंतर सकाळी ६ वाजता श्री देवीजीस एक सामुदायिक दुग्धा अभिषेक करण्यात आला. यानंतर श्री तुळजा भवानी मातेस वस्ञोअलंकार चढवून श्री देवीजीची नित्योपचार करण्यात आली यानंतर श्री देवीजीच्या सिंहासनावर शहरातील एका श्रद्धाळु भाविकांकडुन देण्यात आलेली १०१ हाफुस केसर आंब्याची आरास मांडण्यात आली.
या वेळी श्री तुळजा भवानी मातेचे पाळीचे मुख्य भोपे पुजारी विकास मलबा,शशीकांत परमेश्वर श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानचे कर्मचारी विश्वास परमेश्वर उपस्थित होते. या वर्षी प्रथमच संपूर्ण भारतासह, महाराष्ट्रात कोरोना विषारी वायु चा प्रसार झाल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र लाँकडाऊन झाल्यामुळे भाविका विना तिर्थ क्षेत्र श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारा सह शहरातील रस्त्यावर सन्नाटा पसरला होता. तुळजापुर शहरातील न.प.प्रशासन, पोलीस प्रशासकीय यंञणा,आरोग्य विभागआदीसह इतर विभाग कोरोना वायरस बाबतीत चांगल्या प्रकारे परिश्रम घेत आहेत.