काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील  मौजे खुंटेवाडी येथे झारखंड येथील लॉकडाऊनमुळे अडकलेल्या 10 कामगारांना तहसीलदार श्री.सौदागर तांदळे, नायब तहसीलदार श्री संदिप जाधव यांचे वतीने गुरुवार दि. (30) रोजी 4 वाजता काटी सज्जाचे   तलाठी प्रशांत गुळवे यांचे मार्फत झारखंड मधील 16 इलेक्ट्रिशियन कामगारांना अन्नधान्याची किट वाटप करण्यात आले. या किटमध्ये तांदूळ, तुरीची डाळ,ज्वारी, साखर यांचा समावेश होता.
     
यावेळी उपसरपंच महादेव जाधव, पोलिस पाटील, सुजित जाधव, ग्राम पंचायत सदस्य लिंबराज शिनगारे उपस्थित होते.
 
Top