मुरूम, दि. ०७ : विश्वाला शांततेचा,बंधुतेचा आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुध्द यांची २५६४ वी जयंती गुरुवार(ता.७)रोजी भीमनगर येथे बौद्ध पोर्णिमा प्रत्येक कुटूंबात मोठया आनंदाने साजरी करण्यात आली.

 गौतम बुद्धांच्या प्रतिमेस रुपचंद गायकवाड,प्रा.आण्णाराव कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोरोना विषाणूच्या संकटातही लॉकडाऊनच्या शिस्तीचे पालन करून नगरसेवक सहदेव गायकवाड,वसंत विद्यार्थी वसतिगृहाचे अधिक्षक महेंद्र कांबळे,विजय कांबळे,महेंद्र गायकवाड,रुपचंद गायकवाड,मिलींद कांबळे,प्रा.डॉ.सिद्धार्थ मुरूमकर,संतोष कांबळे आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 यावेळी प्रा.आण्णाराव कांबळे यांच्या परिवाराकडून लहान बालकांना दूधखीर वाटप करण्यात आली.हर्षल,अदित्य, सौ.वैशाली व रेश्मा कांबळे,प्रा.नानाराव कांबळे यांनी बुद्ध वंदना घेतली.
 
Top