काटी : उमाजी गायकवाड

कोरोना च्या संकटामुळे कृषी व्यावसायिकांना महाराष्ट्र सरकार कृषी विभागाने शेतकरी बांधवांना खरीप हंगामासाठी बांधावर जाऊन मार्गदर्शन व खते व औषधांचा पुरवठा करण्यासाठी कृषी व्यावसायिकांना आव्हान केले आहे, त्यानुसार तामलवाडी येथील बालाजी कृषी सेवा चे चालक श्री.बसवराज मसुते यांनी उस्मानाबाद जिल्ह्य़ात काल प्रथम तुळजापूर तालुक्यातील नंदगाव, लोहगाव या गावातील शेतकरी अॅड.तानाजीराव जगताप,सिध्दाराम खुब्बा व इतर ही शेतकरी बांधवाना भाडोत्री गाडी घेऊन जाऊन भारत सरकार अपेडा प्रमाणित सेंद्रीय खते व सोयाबीन व इतर पिकांच्या बियाणे साठी बीज प्रक्रिया साठी सेंद्रीय औषधांचा पुरवठा केला आहे.


एक रूपाया ही नफा न घेता किंवा कसल्याही प्रकारे वाहतूक भाडे वैगरे न घेता संपूर्ण जिल्ह्य़ातील व जिल्हाबाहेरील शेतकरी बांधवांना ना ही विना मोबदला सेवा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

यावर्षी शेतकरी मोठय़ा संकटात असल्याने मोफत सेवा देऊन अल्प प्रमाणात का होईना शेतकरी बांधवांस दिलासा व मदत करण्याचा प्रयत्न करत आहे असे त्यांनी मनोदय व्यक्त केला, व या उपक्रमासाठी मला अत्यावश्यक सेवेचा जिल्हा भरासाठी संबंधितांकडून पास मिळावा.अशी विनंती आमच्या प्रतिनिधी कडे व्यक्त केली आहे.
 
Top