तुळजापुर : कुमार नाईकवाडी
कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर तुळजापुर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने दि.७ गुरुवार रोजी तुळजापुर येथील तहसिल कार्यालय, विज महावितरण, ग्रामीण रुग्णालय येथे सँनिटायझर देण्यात आले.
तुळजापुर शहरातील तहसिल कार्यालय येथे तहसीलदार श्री सौदागर तांदळे साहेब यांना, विज महावितरण येथे सहायक अभियंता श्री दिपक मुंडकर,प्रदीप कावरे, तसेच,ग्रामिण रुग्णालय येथे डॉ अमित शिरसिकर, डॉक्टर देशमुख यांना हे सँनिटायझर सुपुर्द करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष श्री सचिन(भैय्या)रोचकरी,पत्रकार गुरनाथ बडुरे, नगरसेवक अभिजित कदम, रत्नदिप भोसले, हे उपस्थित होते
