मुंबई : रविवार दि.०३ मे २०२० रोजी कृष्णकुंज, शिवाजी पार्क, दादर येथे मनसे नेते श्री.अमित राज ठाकरे व सौ.शर्मिलाताई राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील डाॅक्टरांसाठी हायप्रोटीन्स युक्त खाद्य पदार्थ डाॅक्टरांची नामांकित संस्था असलेल्या मार्डचे अध्यक्ष श्री.राहल वाघ आणि त्यांच्या टीमकडे स्वाधीन केले. याअगोदर सुध्दा मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरकारी डाॅक्टरांना पीपीई किटस् , मास्क्स, हाॅस्पीटल्स बेडशिट आदी साहित्य सरकारी निवासी डाॅक्टरांना दिले होते. रुग्णाची कोरोना विषाणूची तपासणी करताना एकदा का तुम्ही पीपीई किटस् चढवले कि तुम्हाला ८-१० तास काहीही खाता येत नाही, त्यामुळे यावेळी काम करत असताना डाॅक्टरांना हाय प्रोटीन्सची खूप गरज असते, ही गोष्ट जेव्हा मनसे नेते अमित ठाकरे यांना समजताच त्यांनी ४ हजार प्रोटीन्सयुक्त खाद्य पदार्थाचे पॅकेट आज सरकारी निवासी डाॅक्टरांसाठी उपलब्ध करुन दिल्या..
अमितसाहेब ठाकरेंच्या या दिलदार मदतीबद्दल आज पुन्हा एकदा निवासी डाॅक्टरांच्या मार्ड संघटनेने त्यांचे जाहिर आभार मानले,अशी माहिती मनसेचे कृषी व दुग्धविकास शॅडो कॅबिनेट मंत्री तथा माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे कदम यांनी दिली.