काटी : उमाजी गायकवाड
कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंढे यांनी रविवार दि. (3) रोजी जिल्ह्यात पुकारलेल्या एकदिवसीय "जनता कर्फ्यूच्या" आवाहनाला तुळजापूर तालुक्यातील काटी येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत 100 टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला.
कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच संसर्ग टाळण्याच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंढे यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात एकदिवसीय "जनता कर्फ्यु" चे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी बंद पाळत उत्सफुर्त सहभाग नोंदवला. सर्व नागरिक घरातच बसून राहिल्याने गावातील बसस्थानक परिसर, मुख्य बाजार चौक, गाटे गल्ली, माळी गल्ली, आदी सर्व रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसत होते. मेडिकल दुकाने वगळता सर्व दुकाने बंद होती.