मुरूम, दि. ०३ : रमजान हा ईस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो.पण यंदा या रमजानवर कोरोना संसर्गाचे सावट आले आहे.

या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे.खेळण्या बागडण्यांच्या वयात त्यांना या कठीण परिस्थितीला तोंड दयावे लागत आहे.अशा या काळात या चिमुकल्यांना कुठेही बाहेर जाता येईनासे झाले आहे.कारण कोरोनाचा राक्षस बाहेर रस्त्यांवरती फिरत आहे.त्यात हा रमजानचा महिना आल्याने कुमारी आफिया असलम सय्यद ही इयत्ता पहिली वर्गात शिकत आहे.या मुलीने अल्लाहला प्रार्थना केली की,माझ्या संपूर्ण देशातील बांधवांना या भयानक कोरोना संसर्गातून सुटका कर आणि या कोरोनाचा नायनाट कर.कोरोनामुळे हजारो लोक उपासमारीने त्रस्त व भयग्रस्त आहेत अशा गरजूंना समाजातील विविध लोक मदत करत आहेत.पण आपणही उपासी राहून गरीबीची जाण  आपल्या सर्वांना झाली पाहिजे.लोकांच्या मनामध्ये गरीबीबद्ल आदर,दया,आस्था व करूना उत्पन्न होऊन गरजूंना दानधर्म करण्याची इच्छा निर्माण व्हावी.खऱ्या अर्थाने या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव दानधर्म करतात.यंदा योगायोगाने हा पवित्र महिना आल्याने मी भक्तिभावाने दानधर्म करण्याचा संकल्प म्हणून मी रोजा धरला असून या संकटातून सर्वांची सुटका व्हावी अशी भावना आफिया या सहा वर्षाच्या चिमुकलीने व्यक्त केली.या चिमुकलीच्या    संकल्पनेबद्ल परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे.तीच्या या कल्पतेचा आदर्श सर्वांनी घ्यावा अशी नागरिकांमध्ये चर्चा केली जात आहे.
 
Top