तुळजापूर : कुमार नाईकवाडी
शहरात गेल्या १७ मार्च पासुन कोरोना वायरसचा पादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावुन प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहेत या मध्ये पोलीस विभागातील अधिकारी पोलीस बांधव ,रुग्नालयातील डाँक्टर, सिस्टर ,तसेच तहसीलदार व कर्मचारी न.प.मुख्याधिकारी व कर्मचारी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक शहराबाहेरील सिमेवरती चेक पोस्ट वर सेवा देणारे कर्मचारी अहोराञ परिश्रम घेत आहेत तसेच या सर्व विभागातील कर्मचारी वर्गानी लाँकडाऊन ,संचार बंदी काळात मोलाची साथ देण्यात आली सर्वाच्यां सहकार्यामुळे कोरोना वायरस पासुन सरक्षंण झाले संपुर्ण उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये आला आहे तो पुढे असाच राहावा म्हणून तुळजापुर चे नगराध्यक्ष सचिन रोचकरी व त्यांचे सहकारी,व नगरसेवक यांनी पुष्प वृष्टी केली. तसेच तुळजापुर शहरातील नागरीकांनी मोलांची साथ द्यावी न.प.सहकार्य करावे अशी भावना व्यक्त केली.