अणदूर, दि. 19 :
कोरोना च्या भीषण संकटात संपूर्ण व्यवस्थेवर परिणाम झाले आहेत संपूर्ण जीवन यामध्ये ढवळून निघून माणूस भयग्रस्त झाला आहे .रोजगार, काम धंदे ,हिरावल्याने अडचणीत भर पडत आहे, यामध्ये सामान्य कुटुंबाची तर खूप मोठी परवड सुरू असून उपासमारीचे भय दाट होत आहे ,या स्थितीवर मात व्हावी म्हणून अनेक ठिकाणी अन्नक्षेत्र ,अन्नधान्य किट, व अन्य मदतीने माणूस माणसासाठी उभा टाकत आहे.
कोरोना लाँकडाऊन काळात अणदुर (ता. तुळजापूर) येथील केशव वाचनालय व साहेबराव घुगे मित्र मंडळाच्या वतीने १ एप्रिलपासून निराधार ,विधवा ,सांभाळ होत नसलेल्या वयोवृद्ध अशा अत्यंत गरजू नागरिकांना घरपोच जेवण देऊन या वर्गातील ४० जणांना गेली ५० दिवसापासून जेवण देऊन मोठा आधार दिला आहे,
संस्थेचे रूप छोटे असले तरी संकटकाळात पुढाकार मोठा ठरत आहे समाजाप्रती केलेल्या या कामामुळे या मंडळीची उपासमार टळली असल्याचे समोर येत आहे जागेवरुन हलता येत नसलेल्या यातील काही वयोवृद्ध मंडळीची उठबस सुरू असल्याचे दिलासा जनक चित्र या घरपोच जेवण अभियानाने पाहावयास मिळत आहे,
1 एप्रिलपासून 12 नागरिका पासून सुरू केलेले अभियान दिनांक 19 पर्यंत 40 जना पर्यंत पोहोचले आहे, या वयात शारीरिक क्षमता नीट नसते म्हणून याचा विचार करून जर पाच दिवसाला ओवारेस पॉकेट( ऊर्जा पेय) जेवणाबरोबर वितरित केले जात आहे.
अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी या मंडळीस पुरणपोळीचे जेवण ही भरवण्यात आले आहे अधून-मधून बिस्किट, चिप्स ,केळी ,वाटपही करण्यात येत आहे. या सेवा कार्यात दुसऱ्या लाँकडाऊन पासून अनेक मंडळीचा हातभार लागत असल्याने ही सेवा सातत्य ठेवून पुढे जात आहे. मुंबईहून तामिळनाडू कडे जात असताना अणदुर येथे अडकून पडलेल्या चालकास या अभियानांतर्गत चार दिवस जेवण देण्यात आले ,एकूणच केशव वाचनालय व साहेबराव घुगे मित्र मंडळाकडून सुरू असलेल्या घरपोच जेवण अभियानाने निराधार मंडळीस खूप मोठा दिलासा मिळाला असून लाँकडाऊनच्या चौथ्या चरणाच्या शेवटपर्यंत हे अभियान सुरू ठेवणार असल्याचे अभियान प्रमुख साहेबराव घुगे यांनी सांगितले आहे.
जनजागृती मध्ये ही पुढाकार
दि.१८ मार्च ते २३ मार्च या काळामध्ये केशव वाचनालयाच्या वतीने जनतेमध्ये जागृती व्हावी म्हणून गावात दीड हजार पत्रके वितरीत करून १०० किशोरवयीन मुला-मुलींना माँस्क, डेटॉल साबणाचे वाटप केले आहे तसेच गावातील सफाई कामगार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मास्क ,डेटॉल साबण वाटप करून कोरोना योद्धा म्हणून जनतेच्या सेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टर मंडळींना ,मेडिकल दुकानदार कोरोना कक्षातील कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला आहे,
या संपूर्ण सेवाकार्यात उमाकांत करपे, महावीर कंदले ,काशिनाथ घुगे अनिल अणदुरकर, शिवानंद खुने,म्हाळाप्पा घोडके, शाहूराज मोकाशे ,राजकुमार गोवे,प्रज्योत करपे, विश्वनाथ लोंढे, राजू मुळे , अनंत भैय्या अणदुरकर, बालाजी कुलकर्णी, सोमनाथ लंगडे, राहुल राठोड ,संपत वाघे ,बसवराज पाटील, चेतन तोग्गी,हे परिश्रम घेत आहेत,
