वागदरी : एस.के.गायकवाड 

 तुळजापूर तालुक्यातील वागदरी  येथे बाहेर गावारुन आलेल्या व्यक्तीसाठी क्वारंटाईन करण्यासाठी ग्रा.प. ने शासनाच्या आदेशानुसार आरक्षित करण्यात आलेल्या येथील जि.प. प्रथमीक शाळेच्या परिसराची स्वच्छता येथे  क्वरंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तीनी केली.
   
 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. लाँकडामुळे मजूर, कंपनी कामगार, बांधकाम कामगार, व इतर छोटे मोठे व्यवसायीकांचे सर्व  कामधंदा बंद पडलेल्याने उपासमार टाळण्यासाठी ते आपापल्या गावाकडे  येत आहेत.आशा परजिल्ह्यातून  परत आपल्या गावी आलेल्या व्यक्तीना शाळेत क्वारंटाईन केले जात आहे.

 सध्या वागदरी येथील जि.प.प्राथमिक शाळेत १७ व्यक्तीना क्वारंटाईन केले आहे. दि.१८/ मे /२०२० रोजी आमची शाळा आमचा आभिमान म्हणत क्वारंटाईन युवक दत्तात्र झेंडारे,सुजीत मिटकर,खंडू कांबळे, धनाजी भवाळ,राजाबाई कांबळे आदींनी ग्रा.प.सदस्य रावसाहेब वाघमारे यांच्या पुढाकारातून शाळा परिसराची स्वच्छता केली. क्वारंटाईन व्यक्तीनी राबविलेल्या या स्वच्छता उपक्रमाचे ग्रामस्थांतून कौतुक केले जात आहे.
 
Top