तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील पी.पी.पटेल या आस्थापनेने प्रशासनाचे लेखी आदेश असतानाही प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कामगाराना लाॅकडाऊन काळातील वेतन दिले नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली.कोरोनोच्या पार्श्वभूमीवर अशीही उपासमार होत असल्याने आस्थापनेतील कामगारांनी वेतन व भत्ते मिळावे यासाठी दि.१९ रोजी प्रशासनाचे नियम पाळून घरीच सहकुटुंब एकदिवशीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले आहे.याची आस्थापनेने व प्रशासनाने दखल न घेतल्यास सात दिवसानंतर पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे पी.पी.पटेल कामगार संटनेचे अध्यक्ष तथा भ्रष्टाचार निर्मूलन कामगार तालुका अध्यक्ष अंबादास गायकवाड यानी बोलताना सांगितले आहे.
कोविड - १९ चा वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संपुर्ण देशामध्ये दि. २२ मार्चपासुन लाॅकडाऊन घोषीत केला.या लाॅकडाऊनच्या काळात कामगारांची उपासमार होऊ नये यासाठी कामावर समजुन वेतन व भत्ते देण्याचे आदेश कंपन्या व इतर आस्थापनेला प्रशासनाने दिले.परंतु तामलवाडी ता तुळजापुर येथील पी.पी.पटेल या कंपनीने कामगारांचे वेतन देण्यास नकार दर्शविला याची दखल घेऊन भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यानी दि.१७ एप्रिल रोजी कामगार राज्यमंत्री,जिल्हाधिकारी याना याबाबत लेखी निवेदन दिले.या निवेदनाची दखल घेऊन जिल्हा कामगार प्रशासनाने पी.पी.पटेल या कंपनीस कामगारांचे तात्काळ वेतन व भत्ते देण्याचे आदेश दिले. परंतु कंपनीचे मालक यानी वेतन व भत्ते न देता प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आजतागायत वेतन व भत्ते कामगारांना न दिल्याने कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.कोरोनोच्या या वाढत्या प्रभावामुळे लाॅकडाऊन आणखी ३१ मे पर्यंत वाढवला गेल्याने आता खायचे काय ? असा प्रश्न कामगाराना पडला.यावेळी शिवाजी सावंत व पी.पी.पटेल कंपनी कामगार संघटनेचे अध्यक्ष अंबादास गायकवाड यानी सर्व कामगारांशी चर्चा करून कुटुंबासमवेत घरीच एकदिवशीय लाक्षणिक उपोषण आंदोलनाचा मार्ग अवलंबला.लाॅकडाऊन काळात असेही उपासमार होतच असल्याने लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन करीत दि.१९ रोजी पी.पी.पटेल कंपनीच्या कामगारांनी आपल्या कुटुंबासमवेत लाॅकडाऊन काळातील वेतन व भत्ते मिळण्यासाठी घरातच एकदवशीय उपोषण आंदोलन केले.यावर तोडगा न निघाल्यास सात दिवसानंतर पुन्हा कुटुंबासमवेत घरातच आमरण उपोषण करणार असल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा भ्रष्टाचार निर्मूलन कामगार तालुका अध्यक्ष अंबादास गायकवाड यानी बोलताना सांगितले आहे. पी.पी. पटेल कंपनी कामगारांचे वेतन तात्काळ देणार का? प्रशासन आता काय कारवाई करणार? याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कामगारांशी चर्चा करण्यास तयार - जयेशभाई पटेल
कोरोनोच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन काळात कामगारांची उपासमार होऊ नये यासाठी अन्न धान्याचे कीट दिले असुन माहे मार्च महीन्याचे वेतन कामगारांच्या खात्यावर जमा केले आहे. पुढील लाॅकडाऊन काळातील वेतनासाठी शासननिर्णय पाहुन निर्णय घेण्यात येईल तोपर्यंत आम्ही कामगारांशी सविस्तर चर्चा करण्यास तयार आहोत.परंतु या चर्चेकरीता कंपनीबाहेरील कोणीही व्यक्ती या चर्चेत नको आहे असे पी.पी.पटेल कंपनीचे मालक जयेशभाई पटेल यानी बोलताना सांगितले आहे.
