तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी गणाचे कर्तव्यदक्ष पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शिंदे यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.८ रोजी येथील कोरोना कक्षास थर्मल मशीनची मदत केली असुन या मशीनद्वारे गावातील नागरकांची थर्मल तपासणी करण्यास मदत होणार आहे.
कोविड- १९ या विषाणुचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे.राज्यातील अनेक शहरामध्ये या संसर्गाने थैमान घातले असुन सोलापूर शहरातही कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे.तामलवाडी गावापासुन अवघ्या दहा की.मी.अंतरावरील उळे या गावामध्ये कोरोनाचा रूग्ण आढळल्याने तामलवाडी बफर झोनमध्ये आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये नागरीकांची थर्मल मशीनच्या माध्यमातून तपासणी व्हावी या उदात्त हेतुने तामलवाडी पंचायत गणाचे कर्तव्यदक्ष पंचायत समिती सदस्य यानी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आरोग्य उपकेंद्र येथील कोरोना कक्षास थर्मल स्क्रीनींग मशीनची मदत केली.या अगोदरही दत्तात्रय शिंदे यानी आपले तीन महीन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले आहेत.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव गावामध्ये होऊ नये आपले गाव कोरोनामुक्तच रहावे यासाठी ते वेळोवेळी मदत आणी मार्गदर्शन करत असल्याचे डाॅ.संगीता चव्हाण यानी सांगितले.थर्मल मशीन दिल्यानंतर लगेचच सर्जेराव गायकवाड,अमोल शिंदे,बाळासाहेब रणसुरे यांची थर्मल तपासणी करण्यात आली.या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
याप्रसंगी कोरोना कक्षाच्या डाॅ.शुभांगी जळकोटे,डाॅ.संगीता चव्हाण,पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शिंदे,संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सर्जेराव गायकवाड,तुकाराम सुरवसे,बाळासाहेब रणसुरे,अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
