काटी, दि. ०८ : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी  दि. 8मे 2020  येथील त्र्यंबकेश्वर  बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ तामलवाडी संचलित सरस्वती माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा तुळजापूर पंचायत समितीचे  माजी उपसभापती चंद्रकांत (अप्पा) बसवणप्पा मसुते वय (86)यांचे शुक्रवार दि.(8) रोजी सकाळी ,6:30 वाजता अल्पशा आजाराने  दुःखद निधन झाले. 

 त्यांचे पार्थिवावर तामलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे,पणतू असा मोठा परिवार आहे.
 
Top