उस्मानाबाद, दि. ०८ : लॉकडाउन काळात केशकर्तनालय बंदीचे आदेश असतांनाही दि.08.05.2020 रोजी त्या आदेशाची अवहेलना करुन 1)सुनिल अभिमन्यु घागरे रा. सिंदफळ 2)तुकाराम सोपान लोखंडे रा. बार्शी यांनी तुळजापूर येथील जुन्या बसस्थानका मागील ‘व्हीआयपी मेन्स पार्लर’ व्यवसायासाठी खुले ठेवले.  तर, सलीम नजीम काझी रा. गालीबनगर, उस्मानाबाद यांनी दि. 08.05.2020 रोजी ताजमहाल चित्रमंदीर जवळील आपल्या दुकानात ग्राहकांत सुरक्षीत अंतर न ठेवता गर्दी निर्माण केली.

            यावरुन वरील तीघांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.
 
Top