पोलीस ठाणे, तुळजापूर : महेश केशव नवगीरे, सोमनाथ नवलिंग कोल्हे, बाबुराव बब्रुवान यावलकर, नवनाथ भास्कर क्षिरसागर व अन्य 5 व्यक्ती सर्व रा. बारुळ, ता. तुळजापूर या सर्वांनी दि. 06.05.2020 रोजी बारुळ येथील चौकात एकत्र जमून महेश नवगीरे याचा वाढदिवस साजरा केला. अशा प्रकारे त्यांनी मा.जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करुन नाका- तोंडास मास्क न लावता एकत्र जमून मानवी जिवीत धोक्यात येईल असे निष्काळजीपणाचे कृत्य केले. यावरुन पोलीस पाटील- शिवाजी सगर यांच्या फिर्यादीवरुन वरील सर्वांविरुध्द भा.दं.वि. कलम- 188 सह, म.पो.का. कलम- 135 सह, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 07.05.2020 रोजी दाखल करण्यात आला आहे
 
Top