तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापुरात रविवारी सायंकाळी ८ ते८ /३० सुमारास पाऊसाच्या रिमझीम सरी कोसळल्या. उन्हाळ्यात उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना कांहीसा गारवा मिळाला तर हवेत गारवा निर्माण झाला होता. जवळपास १५ ते २० मिनिट पावसाने हजेरी लावल्याने शहरात सर्वञ पाणीच पाणी झाले होते.तर कांहीनी जुन माहिन्याच्या पुर्व संधेला पाऊस आल्याने मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला.हवामान खात्याने या पुर्वीच सांगितले आहे की, १ जुन ते १३ जुन पर्यत पाऊसाचे मोठे आगमन होणार आहे.बळीराजा शेतकरी मोठ्या पाऊसाच्या प्रतिक्षेनंतर काळ्या आई ची ओटी भरण्यास सज्ज असणार आहे.
