उस्मानाबाद :
उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार दिनांक ३१ मे रोजी आणखी दोन जणांच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आणखी १० जणांचे तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधितांची संख्या 73 झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातून एकूण 80 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात तपासणी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून १० जणांचे तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत . आढळलेल्या दोन रुग्णांपैकी एक नळदुर्ग येथील असून दुसरा उस्मानाबाद तालुक्यातील सुंभा येथील एका कोरुना बाधित मयत व्यक्तीच्या संपर्कात आलेला व्यक्ती आहे. दोघांवरही उस्मानाबाद इथ जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार चालू आहेत..
