तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 कर्नाटक तेलगंणाचा धर्तीवर शेतकऱ्यांना रबी पेरणी साठी हेक्टरी पंचवीस हजार रुपयाची मदत करण्याची मागणी स्वाभीमानीशेतकरीसंघटनेने जिल्हाधिकारी यांना तहसिलदार मार्फत दि.१जुन सोमवार रोजी निवेदन देवून केली आहे.             
                     
   या निवेदनात अस म्हटलं आहे की कोरोना च्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लाँकडाऊन मुळे शेतकऱ्यांचा शेतमाल फळे भाजीपाला विकला न गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले असुन शेतकऱ्यांन जवळ सध्या रबी पेरणी साठी बि बियाणे खते विकत घेण्यासाठी पैसे नाहीत तरी तेलगंणा सरकार ने कर्नाटकातील तेथील शेतकऱ्यांना रबीपेरणी साठी अर्थिक मदत केल्याने शेतकऱ्यांना रबी पेरणीसाठी हेक्टरी पंचवीस हजार रुपये  अर्थिक मदत द्यावी म्हणजे तो रबीपेरणी करेल. अर्थिक मदत न दिल्यास स्वाभीमानी शेतकरी संघटना वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला या वेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी  निवेदन देवुन दिला यावेळी बापुसाहेब भोसले सुनिल घाडगे  सह आदीसह शेतकरी उपस्थितीत होते.
 
Top