काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील कतारमध्ये अडकलेले संभाजी सुनिल जाधव, कुलदिप धनाजी जाधव, कुवेत मध्ये अडकलेले संजय जाधव, नागेश जाधव, भरत जाधव, अबुधाबी मध्ये अडकलेले महेश जाधव, विनोद कदम, अरविंद जाधव तर कतार मध्येच अडकलेले उस्मानाबाद जिल्ह्या शेजारील सोलापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर समजले जाणाऱ्या धामणगाव गावातील भास्कर शिंदे, सुदर्शन बोधले हे Qcon कंपनीत कामानिमित्त गेले होते. कंपनीने कामही मार्च महिन्यात पुर्णपणे बंद केलेले आहे. त्यामुळे आमचे येथील मासिक वेतनही बंद असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून येथे फारच तणावाचे वातावरण असल्याचे Video द्वारे तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील कुलदीप जाधव यांनी सांगून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांचेकडे सुटकेसाठी विनंती केली आहे.
या Video मधून त्याने महाराष्ट्र वगळता कत्तार मधून केरळ, अहमदाबाद, कोची, दिल्ली, हैदराबाद आदी ठिकाणातील कामगार मायदेशी येत असून आम्हाला मायदेशी परत यायचे आहे,आम्ही फार अडचणीत आहोत, आम्हाला आपल्या महाराष्ट्रात घेऊन येण्याची व्यवस्था करावी अशी विनंती कत्तारहुन उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील कामगारांनी Video द्वारे मा. मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
