तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे १४ वा वित्त आयोग व आमदार निधीतुन अंतर्गत सिमेंट रस्त्याची काही कामे ही पुर्ण झाली असुन काही कामे सध्या प्रगतीपथावर असल्याचे दिसुन येत आहे.

     गाव, खेड्यांचा विकास होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने प्रत्येक वर्षी लाखो रूपयाचा निधी थेट ग्रामपंचायतीना दिला जात आहे. जेणेकरूण गावविकासाचा आराखडा तयार करून तो निधी वापरात आणुन गावातील रस्ते, वीज, पाणी,डीजीटल शाळा,स्वच्छता,ईत्यादीसाठी वापर करून गावविकास साधता येईल व गावातील रस्ता,पाणी,गटारीच्या समस्या सुटतील .गेली अनेक वर्षापासून नागरीकांमधुन तामलवाडी येथे अंतर्गत सिमेंट रस्त्याची मागणी होत होती ती मागणी आता कुठेतरी पुर्ण होताना दिसत आहे.

१४ वा वित्त आयोगाच्या निधीमधुन अंदाजे किमंत तीन तीन लाख रूपये कीमतीचे पिंपळा रस्ता ते सुधाकर घोटकर,पांडुरंग पटाडे ते प्रभाकर जाधव, व किरण घोटकर ते सनराईज इंग्लिश स्कुल व रावळे गल्ली येथे गटारीसह सिमेंट रस्ता  असे चार अंतर्गत सिमेंट रस्ते हे पुर्ण झाले आहेत.तर आमदार निधीतुन चनप्पा मसुते ते नागनाथ नेटके,सार्थक क्लिनिक ते दस्तगीर शेख रस्ता,सावळे किराणा दुकान ते उत्तम पाटील असे तीन सीमेंट रस्त्याची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.दोन ते तीन दिवसात ती कामेही पुर्ण होतील असे ग्रामसेवक लाटकर यानी बोलताना सांगितले. शिवरत्न नगर येथील शिवदास पाटील ते दत्तात्रय घोटकर इथपर्यंतचा सिमेंट रस्ताही दि. ३१ रोजी पुर्ण झाला असल्याचेही ग्रामसेवक पी.एन.लाटकर यानी सांगितले.पावसाळा सुरू होण्यापुर्वी गावातील विजय नगर,शिवरत्न नगर,तसेच इतर ठिकाणच्या काही भागातील १४ वा वित्त आयोगाच्या निधीमधुन  अंतर्गत सिमेंट रस्त्याची कामे ही पुर्ण झाली असुन आमदार निधीमधील काही कामे ही प्रगतीपथावर असल्याने ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्त होताना दिसत आहे.

रस्त्यावर लावलेले लोखंडी फलकच गायब 

तामलवाडी येथील अंतर्गत सिमेंट रस्त्याची कामे पुर्ण झाल्यानंतर त्याठिकाणी कामाचे वर्णन,कामाची किमंत,कुठल्या निधीचे काम,रस्ता पुर्ण झालेली तारीख असा उल्लेख असलेले लोखंडी फलक पुर्ण झालेल्या चारही रस्त्यावर लावण्यात आले होते परंतु या चारही रस्त्यावरचे लोखंडी फलकच रातोरात गायब झाल्याचे काही नागरीकांनी सांगितले. हे लोखंडी फलक गायब झाल्याने नागरीक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
 
Top