तुळजापूर, दि. 02 :

 तुळजापूर नगर परिषदेने  शादीखाना यात्रा मैदानात बाधण्यासाठी दि. २७ मे रोजी ठराव  घेतला  असुन शहरातील  सर्व मंगल कार्यालय सर्व धर्मियांसाठी उपलब्ध  असताना हा ठराव रद्द करण्याची मागणी मनसेने जिल्हाधिकारी यांच्याकडे दि.१ जुन रोजी केली आहे.

 निवेदनात पुढे म्हटले आहे की ,शादीखाना  करण्याबाबत  विरोध नाही.परंतू शुक्रवार पेठेतील ज्या यात्रा मैदानात करण्याचा नगरपरिषदेने ठराव घेऊन मनमानी कारभार करीत असल्याचा  अरोप करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  निषेध व्यक्त करीत  असल्याचे सांगुन यापुर्वीच यात्रा मैदानमधील नगरपरिषदेच्या मालकीच्या भक्त निवास या जागेवर  सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल करण्याचा घाट  घालण्यात आला होता. भक्तनिवास बांधकामात अनेक गैरप्रकार  असून त्याठिकाणी ही सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल करणे शक्य नसताना आमदार राणाजगजितसिंह पाटिल व  नगरपारिषदेने राजकारण करीत आसल्याचा आरोप मनसेने केला आहे.

 उदात्त हेतूने कै.माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तुळजापूरचा विकास व्हावा , येथे येणा-या भाविकांना जास्तीत जास्त  सुविधा मिळाव्यात यासाठी ३२५ कोटींची तुळजापूर शहर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मदत केली.अनेक कामात गैरप्रकार  झालेला आहे.

 यात्रा मैदान या ठिकाणी श्री तुळजा भवानी मातेच्या धार्मिक विधीसाठी,  येणा-या भाविक भक्तांसाठी तसेच या भागातील पुजारीवर्ग , सर्व   नागरिक   छोटे मोठे कार्यक्रम करतात, भाविकांना राहण्याची देखील सोय केली जाते.

 माञ या ठिकाणी शादिखाना ही वास्तू उभी करू नये.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांसमवेत मनसे स्टाईलने अंदोलन करण्याचा इशारा मनसेने देवुन   या मागणीचा  विचार करून यात्रा मैदानात   शादिखाना करण्याबाबत घेतलेला हा ठराव त्वरित रद्द करण्याची मागणी मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम-परमेश्वर, तुळजापुर शहराध्यक्ष धर्मराज सावंत, वेदकुमार पेंदे,    प्रमोद कदम यांनी केली आहे.
 
Top