जळकोट,दि.२ : मेघराज किलजे

  कोरोना संकटकाळात निराधारांपुढे रोजगार व उपासमारीची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अणदूर येथील निराधार, विधवा, सांभाळ होत नसलेल्या वयोवृद्ध लोकांची लाॉकडाऊनच्या काळात खूप मोठी अडचण होत असल्याचे समोर येताच साहेबराव घुगे यांच्या पुढाकारातून केशव वाचनालयच्या माध्यमातून दि.१ एप्रिल २०२० पासुन जवळपास ४० निराधारांना 'घरपोच जेवण अभियान' सुरू आहे.

या अनुषंगाने घरपोच जेवण अभियानास आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी भेट देऊन आयोजकांना प्रोत्साहन दिले. भेटी दरम्यान निराधारांशी संवाद साधला. तसेच काही अडचणी असतील तर संपर्क करण्याचा व कोरोनापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला.

कोरोना संकटवेळी या अभियानामुळे निराधार गरजुंना मोठा आधार मिळाला आहे. गेल्या ६२ दिवसापासून अखंडपणे गरजूंना जेवणाची घरपोच सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल अभियानासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन केले. तसेच हे अभियान यशस्वी करण्यासाठी विविध स्वरूपात दान देवून मोलाचा वाटा उचलणाऱ्या दानशूरांचे देखील विशेष आभार व्यक्त केले.

याप्रसंगी जि. प. अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, पिंटु मुळे, अभियान प्रमुख साहेबराव घुगे, सोमनाथ लंगडे, बालाजी कुलकर्णी, काशीनाथ घुगे, राजु मुळे, प्रज्योत करपे आदींची उपस्थिती होती.
 
Top